आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत मिळेल शाही भोजन - रेल्वेमंत्री त्रिवेदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ब-याच वादविवादांनंतर रेल्वे मंत्रालय आपल्या फूड पॉलिसीत बदल करण्यास राजी झाले असून, आता रेल्वेत शाही जेवण मिळण्याची सोयही होणार आहे. ही घोषणा खुद्द रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी जयपूर येथे केली.
जयपूर येथे एका शाही विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्रिवेदी आले होते. ते म्हणाले की, रेल्वेस्थानकांवर आणि गाड्यांमध्ये दिले जाणारे जेवण पौष्टिक आणि स्वादिष्ट असावे यासाठी मंत्रालय योजना तयार करीत आहे. जयपूरमधील शाही विवाहातील शाही भोजनानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे, हे विशेष.
राष्टÑीय रेल्वे धोरणाची आवश्यकता
भारतीय रेल्वेला जपानमधील रेल्वेप्रमाणे अत्याधुनिक बनवण्यासाठी राष्टÑीय रेल्वे धोरण आखण्याची सक्त आवश्यकता असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अपघातांची संख्या कमी करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हे धोरण आवश्यक आहे. जपानमध्ये गेल्या 47 वर्षांत रेल्वेचा एकही अपघात झालेला नाही. राष्टÑीय रेल्वे धोरणातील योजनांवर सरकार बदलल्यानंतरही परिणाम होऊ नये. आता परिस्थिती अशी आहे की, सरकार आणि मंत्री बदलताच योजना गुंडाळून ठेवल्या जातात. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे स्थानके विमानतळांच्या धर्तीवर विकसित करण्यात यावी, असेही ते म्हणाले. गेल्या आठ वर्षांत प्रवासी भाडे वाढवण्यात आलेले नाही. येत्या बजेटमध्येही लोकांशी सल्लामसलत करूनच प्रवासी भाड्याबाबत निर्णय घेतला जाईल.
केटरर्सना आमंत्रण
लग्नातील शाही जेवणानंतर त्रिवेदी यांनी असे जेवण रेल्वेच्या मेनूत समाविष्ट करण्यात येईल, असे सांगितले. असे पदार्थ रेल्वेत पुरवाल का, अशी विचारणाही त्यांनी शाही स्वयंपाक करणा-या केटरर्सकडे केली. विशेष म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मध्ये निकृष्ट जेवणावरून वाद झाल्यानंतर जेवण देणे बंद करण्यात आले होते.
आम्ही केटरिंग पॉलिसीत बदल करीत आहोत. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार जेवण देणारे चांगले केटरर्स आम्हाला हवे आहेत.
दिनेश त्रिवेदी, केंद्रीय रेल्वेमंत्री