आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्‍ये भाजप आमदाराला मारहाण, पत्‍नीचीही केली छेडछाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेष कुमार आणि त्‍यांच्‍या पत्‍नीला रेल्‍वेत मारहाणीची घटना शुक्रवारी घडली. इतकेच नव्‍हे तर कुमार यांच्‍या पत्‍नीची छेडछाडही करण्‍यात आली. या मारहाणीत कुमार यांचा सहा महिन्‍यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.

शिवेष कुमार आपल्‍या पत्‍नीबरोबर दानापुरा-हावरा एक्‍स्‍प्रेसने प्रवास करीत होते. एसी-2 च्‍या कोचमध्‍ये रेल्‍वेच्‍या कर्मचा-यांनी त्‍यांना मारहाण केली. शिवेष कुमार एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी पटनामध्‍ये रेल्‍वेतून प्रवास करीत होते. रेल्‍वेमध्‍ये राजेंद्र नगर येथे 17-18 लोक अवैधरित्‍या आरक्षीत डब्‍यात आले आणि जोरजोरात अश्‍लील बोलू लागले. याला त्‍यांच्‍या विरोध केल्‍यानंतरही त्‍यांनी त्‍यांचे ऐकले नाही. आमदारांच्‍या पत्‍नीने तिकिट निरीक्षकाकडे याची तक्रार केल्‍यानंतर ते सर्व रेल्‍वेचे कर्मचारीच असल्‍याचे समजले. काही वेळांनी या लोकांनी रेल्‍वेतच दारू पिण्‍यास सुरूवात केली.

जेव्‍हा आमदारांनी याचा विरोध केला तेव्‍हा त्‍यांना जबर मारहाण करण्‍यात आली. तसेच त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या तोंडावर दारू फेकण्‍यात आली. त्‍यांच्‍यावर जबरदस्‍ती करण्‍याचाही त्‍यांनी प्रयत्‍न केला.