आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तत्काळ’चा ताळमेळ साधा; सर्वसामान्य प्रवाशांची अनभिज्ञता एजंटांच्या पथ्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - पर्यटन किंवा इतर कारणांनी दूरचा प्रवास करायचा असेल व सुविधा असेल तर रेल्वेप्रवासाला प्राधान्य दिले जाते. मात्र, आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी आरक्षण करण्याची खबरदारीही बहुतांश प्रवासी घेतात. अचानक ठरणारे प्रवासही तत्काळ आरक्षणाच्या माध्यमातून सुखद करण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या व अशा अनेक सुविधांबाबत सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशी माहिती नसते. माहितीअभावी प्रवाशांचे नुकसान होतेच, पण प्रवाशांच्या अनभिज्ञनतेचा गैरफायदा घेत तिकीट एजंट स्वत:चे खिसे भरून घेतात.
तत्काळ आरक्षण प्रवासाच्या एक दिवस आधी करता येते. मात्र, असे आरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचा नियोजित प्रवास सुरू होण्याच्या एक दिवस आधी जात असाल तर तुम्हाला कन्फर्म तिकीट न मिळता प्रतीक्षा यादीत स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण तत्काळ आरक्षण सुविधा तुमचा प्रवास सुरू होण्याच्या एक दिवस आधी नव्हे तर संबंधित रेल्वेने तिच्या नियोजित मार्गावर प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस आधीपासून दिली जाते. मात्र, पुरेशा माहितीअभावी प्रवासी या सुविधेपासून वंचित राहतात व एजंट या सुविधेचा
फायदा उचलतात.
समजा तुम्ही अमृतसर नांदेड सचखंड रेल्वेने 15 तारखेला नांदेडला जाणार आहात. या प्रवासासाठीचे तत्काळ आरक्षण करण्यासाठी तुम्ही इंटरनेट किंवा प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर 14 तारखेला अर्ज केलात, तर आरक्षण कोटा संपल्याचे तुम्हास समजेल. अगदी 14 तारखेला सकाळी 10 वाजता आरक्षण सुविधा सुरू होताच तुम्ही सर्वप्रथम खिडकीवर नंबर लावला, तरीही तुमचे आरक्षण होणे कठीण आहे. इतर प्रवाशांनी बहुधा रेल्वे एजंटांनी तुमच्या आधी कोठून नंबर लावला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. प्रत्यक्षात या सर्वांनी 14 तारखेला तुमच्या आधी नंबर लावलेला नसून एक दिवस पूर्वी म्हणजे 13 तारखेलाच आरक्षण करून घेतलेले असते. कारण तत्काळ आरक्षण तुमच्या नव्हे तर ही रेल्वे अमृतसर येथून निघण्याच्या एक दिवस पूर्वी करणे अपेक्षित आहे. अशाप्रकारे देशभरातील सर्वच रेल्वेगाड्यांनी त्यांचा प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस पूर्वी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
रेल्वे मंडळाचे कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) ए. मधुकुमार रेड्डी यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. संबंधित मार्गावर धावणाºया रेल्वेने पहिल्या स्थानकावरून प्रवास सुरू करण्याच्या एक दिवसपूर्वी प्रवाशांनी तत्काळ आरक्षण करून घ्यावे असे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंडळाचे उपसंचालक संजय मनोचा यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना, या नियमात बदल करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तत्काळ आरक्षणाची सांगड रेल्वेच्या प्रवासाऐवजी प्रवाशांच्या प्रवासाशी असावी असे मुनोचा यांनी म्हटले आहे.
तुम्हाला हे माहीत आहे ?
तत्काळ आरक्षण प्रवासाच्या एक दिवस आधी करता येते. मात्र, असे आरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचा नियोजित प्रवास सुरू होण्याच्या एक दिवस आधी जात असाल तर तुम्हाला कन्फर्म तिकीट न मिळता प्रतीक्षा यादीत स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण देशभरातील सर्वच रेल्वेगाड्यांनी त्यांचा प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस पूर्वी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रवाशांच्या प्रवासाच्या तारखांचा तत्काळ आरक्षण सुविधेशी संबंध नाही.