आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Tatkal Ticket Booking Rules Changed In India

तात्काळ तिकिट मिळणार 10 ते 12 वेळेत; आजपासून अंमलबजावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: तत्काळ रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून नवे नियम लागू केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेच्या वेळात तात्काळ तिकिट मिळणार आहे. यापूर्वी तत्काळ तिकिट आठ वाजेपासून मिळत होते. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता समीर गोस्वामी यांनी ही माहिती दिली.
गोस्वामींनी सांगितले की आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आरक्षण करताना एका आयपी अ‍ॅड्रेसवर एकदा केवळ दोन तिकिट बुक करता येणार आहे.
10 वाजेलाच आरक्षण हॉलमध्ये प्रवेश...
तत्काळ तिकिट आरक्षित करण्‍यासाठी आलेल्या प्रवाशांना सकाळी 10 वाजेलाच आरक्षण हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे तिकिटातील काळाबाजार रोकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, ‍तिकिट बुकिंगदरम्यान बुकिंग क्लार्ककडे मोबाईल ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षण फॉर्मवर भरलेल्या फोन नंबर आणि अ‍ॅड्रेसचीही तपासणी होणार आहे. त्यात त्रुटी आढळून आल्यास तिकिट रद्द केले जाणार आहे.
तत्काळ आरक्षणाच्या वेळेत बदल झाल्यामुळे पहाटेपासून रांगा लावणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दलालांचा सुळसुळाटही यामुळे कमी होईल. वेळेत बदल करण्याच्या सूचना असल्या तरी सीसीटीव्ही, मोबाइल जॉमर लावण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

आपले मत...
तत्काळ तिकिट बुकिंगबाबत आजपासून रेल्वे प्रशासनाने नवी प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे यातील काळाबाजार थांबेल? आपल्याला काय वाटते? खाली दिलेल्या कमेंट बॉक्‍समध्ये आपले मत नोंदवा.
तत्काळ तिकिटांच्या गैरप्रकाराची चौकशी
तत्काळ तिकीटांचा अवैध धंदा ? रद्द पीएनआरवर टीटीई तयार करतात नवे तिकीट