आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिल्‍लीत पावसाने मोडला 71 वर्षे जुना विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- हवामानात अचानक झालेल्‍या बदलामुळे राजधानी दिल्‍लीतील लोकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. याचा फटका देशातील दोन सर्वात मोठया राष्‍ट्रीय पक्षांच्‍या नेत्‍यांनाही बसला. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंग आणि राहुल गांधी यांना खराब हवामानामुळे आपले नियोजित कार्यक्रम गुंडाळावे लागले. राजनाथ सिंग यांना मंगळवारी लखनौ येथे जावयाचे होते. मात्र, खराब हवामानामुळे त्‍यांचा कार्यक्रम रद्द करण्‍यात आला. बुधवारी त्‍यांना लखनौवरून अलाहाबाद येथील कुंभ मेळयात सामील व्‍हायचे होते. आता राजनाथ सिंग दिल्‍लीवरून थेट अलाहाबादला जातील. दुसरीकडे कॉंग्रेसचे नवनियुक्‍त उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनाही अमेठीच्‍या दौ-यावर जायचे होते. त्‍यांनाही खराब हवामानाचा फटका बसला.

दिल्‍लीसहित संपूर्ण उत्तर भारतात हवामानामध्‍ये अचानक बदल झाला. पठारी प्रदेशात पाऊस आणि पर्वतमय प्रदेशात बर्फवृष्‍टी झाल्‍याने उत्तर भारतात पुन्‍हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. दिल्‍लीजवळील हरियाणाच्‍या फरीदाबाद जिल्‍ह्यात मंगळवारी सकाळी पाऊसाबरोबर गाराही पडल्‍या. येत्‍या 24 तासात आणखी पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तवली आहे. गेल्‍या 71 वर्षांतील दिल्‍लीतील पावसाचा विक्रम मोडला गेला. फेब्रुवारीमध्‍ये 1942 नंतर पहिल्‍यांदाच एवढया मोठया प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्‍या 24 तासांत दिल्‍लीत 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.