आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raja Bhaiyya Hands Over Resignation To Akhilesh Yadav

डीएसपींच्‍या हत्‍येप्रकरणी गदारोळानंतर राजाभय्या यांचा राजीनामा, अटकेची शक्‍यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्‍ये पोलिस उपअधीक्षकांच्‍या हत्‍येप्रकरणी दबाव वाढल्‍यानंतर रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भय्या यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांच्‍याकडे अन्‍न व नागरी पुरवठा खाते होते. विरोधी पक्षांच्‍या दबावामुळे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांनी राजा भय्या यांच्‍याकडून राजीनामा घेतल्‍याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशातील कुंडाच्या वलीपूर गावात सरपंचाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस उपअधीक्षक झिया उल हक यांना जिवे मारले. पोलिस व ग्रामस्थांच्या धुमश्चक्रीत सरपंचाचा भाऊदेखील मारला गेला. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्‍ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

झिया उल हक यांची पत्‍नी धरणे देत आहे. राजा भय्या यांच्‍या अटकेची मागणी तिने केली आहे. जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार नाही, असे तिने सांगितले आहे.