आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजधर्म : शांत बसले ते उत्तम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येदिंचा दबदबाच भारी
दक्षिण भारतात येदियुरप्पांच्या तोडीचा नेता भाजपला मिळाला तरीही सदानंद गौडांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून नव्या नेत्याला खुर्चीवर बसवणे वाटते तेवढे सोपे काम नाही. त्यातच येदिंच्या नातीचे लग्न झाले. लग्नाला भाजपच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्या-कार्यकर्त्यांना बोलावणे गेले. गटातटाचे राजकारण करणा-या येदिंच्या नातीच्या लग्नाला मोठ-मोठे भाजप नेते आले. नितीन गडकरी, अरुण जेटली, राजनाथ सिंहांसोबत अनेक दिग्गज हजर झाले. केंद्रीय स्तरावरील मोठे नेते येणार म्हणून सदानंद गौडा मागे न राहता आवर्जून उपस्थित राहिले. येदिंच्या घरी झालेली ही पार्टी भाजपसाठी महत्त्वाची होती. पार्टीत येदि कुणासोबत जास्त वेळ बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. पार्टीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींशी त्यांनी जास्त वेळ बातचीत केली.

शांत बसले ते उत्तम!


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आपल्याच मित्र परिवाराकडून हल्ली बरे-वाईट ऐकावे लागत आहे. अशातच पी. चिदंबरम यांनी गहलोतांवर स्तुतिसुमने उधळली. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. तेव्हा शीला दीक्षित आणि मनोहर पर्रिकर यांच्यासह इतर मुख्यमंत्र्यांची तिखट प्रतिक्रिया उमटली. अधिका-यांना परत धाडण्याआधी राज्य सरकारांना कल्पना द्यायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच चिदंबरम गहलोत यांचे कौतुक करत आहेत. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारे विरोध करत असताना गहलोत मात्र शांत असतात.

निशाण्यावर ममता


यूपीए सरकारला वेळोवेळी गोत्यात आणणा-या ममतांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. तृणमूल कोट्यातील मंत्री
मुकुल रॉयसहित इतर खासदारांच्या डिग्रीसंबंधी शंका घेतली जात आहे. त्यातच काँग्रेसला शोध लागला की, ममतादीदींच्या डिग्रीबद्दलही साशंकता आहे. ज्या अमेरिकन विद्यापीठातून ममतांनी शिक्षण घेतले त्या विद्यापीठाचे म्हणणे आहे की, असा कोर्स विद्यापीठात कधीही नव्हता. याआधीही हा मुद्दा चर्चेत आला होता; पण त्या वेळी ममतांचे काँग्रेसविरोधी धोरण तीव्र नव्हते. आता ममता काँग्रेसच्या विरोधातच आहेत तर काँग्रेसनेही प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक खासदारांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे आढळून आले आहे; मात्र या यादीतील तृणमूलच्या खासदारांवरच काँग्रेसचे जास्त लक्ष आहे.