आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajiv Gandhi Cancer Institute To Launch New Technology, NanoKnife For Cancer Treatment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातही नॅनो नाइफ तंत्रज्ञानाद्वारे उपचार होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर संस्था व संशोधन केंद्रात (आरजीसीआय) देशात प्रथमच नॅनो नाइफ (सूक्ष्म चाकूद्वारे शस्त्रक्रिया) तंत्रज्ञानाच्या आधारे शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.


राजधानी दिल्लीत आयोजित तीनदिवसीय संमेलन ‘आरजीकॉन’च्या पहिल्या दिवशी ही माहिती देण्यात आली. राजीव गांधी कॅन्सर संस्थेचे प्रमुख डॉ. शिवेंद्रसिंह यांनी सांगितले की, कॅन्सरवरील उपचारांसाठी ही अत्याधुनिक प्रणाली आहे. यात शरीराच्या संवेदनशील भागात असलेल्या अवयवांच्या आजूबाजूला असलेल्या ट्यूमरमुळे त्रस्त असलेल्या कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो. कारण सूक्ष्म चाकू शस्त्रक्रियेद्वारे अशा प्रकारचे ट्यूमर आता अधिक सुरक्षितरीत्या काढून टाकता येऊ शकेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच उपलब्ध झाले आहे. या संमेलनात देशातील एम्स, टाटा मेमोरियल यासारख्या मोठ्या रुग्णालयांसह जगभरातील 600 कॅन्सरतज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या वेळी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. व्ही. शांता यांना लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

15 कोटींची मशिनरी, तीन ते चार लाखांचे उपचार
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाच सेंटिमीटर आकारापर्यंतच्या ट्यूमरवर वेदनारहित उपचार करता येतात. इतर तंत्रज्ञानांद्वारे याचे उपचार जवळपास अशक्य होते. तज्ज्ञांनी सांगितले की, लाइफ इरिव्हरसिबल इलेक्ट्रोपोरेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याद्वारे शरीरातील अतिसूक्ष्म भागातील ट्यूमरदेखील हटवता येऊ शकतो. या मशिनरीची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे. आहे. या तंत्राची सुरुवात व त्याच्या उपचारावरील खर्चाबाबत त्यांनी सांगितले की संस्थेतर्फे या वर्षी जूनच्या सुरुवातीला या यंत्रणेद्वारे उपचार सुरू होतील. प्रत्येक रुग्णावर उपचारांचा खर्च तीन ते चार लाख रुपये असेल.