आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh To Be Formally Announced New BJP President

भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणून राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मंगळवारच्‍या नाट्यमय घडामोडींनंतर नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला. त्‍यानंतर राजनाथ सिंह यांचे नाव पुढे आले. राजनाथ सिंह यांची भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍‍यक्ष म्‍हणून घोषणा करण्‍यात आली आहे. केवळ त्‍यांचाच अर्ज मिळाला होता. तसेच त्‍यांनी अर्ज मागे घेणार नसल्‍याचे पत्रही निवडणूक निर्णय अधिका-यांना दिले. त्‍यामुळे राजनाथ सिंह यांनी बिनविरोध निवड झाली.

आज सकाळी भाजपच्‍या संसदीय समितीची बैठक झाली. त्‍यात नितीन गडकरी, लालकृष्‍ण अडवणी, सुषमा स्‍वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह वेकय्या नायडू इत्‍यादी नेत्‍यांची उपस्थिती होती. आज सकाळी राजनाथ सिंह आणि लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍यात 20 मिनिटे चर्चा झाली. त्‍यानंतर राजनाथ सिंह गडकरी यांच्‍या निवासस्‍थानी गेले. गडकरी यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर ते भाजप कार्यालयात पोहोचले.