आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अय्यो, इंटरनेट नव्हे, ‘रजनी प्पॉवर’ने चालते की हो वेबसाइट्ट !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - हे शीर्षक भलेही आपल्याला एखादा जोक वाटत असले तरी रजनीकांतची ही वेबसाइट इंटरनेट कनेक्शनने नव्हे, तर ‘रजनी पॉवर’ नेच चालते. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ऑल अबाऊटरजनी डॉट कॉम(www.allaboutrajni.com) या संकेतस्थळाला आपण हिट करताच होम पेजवर एक मेसेज येतो. तो असा- रजनी सामान्य माणूस नाही,

ही साइटदेखील सामान्य नाही. ही रजनी पॉवरनेच चालते. साइटमध्ये एंट्री करण्यासाठी आपले इंटरनेट कनेक्शन बंद करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. आपण नेट बंद करताच साइटवर सुरू होतो रजनी पॉवर ! या संकेतस्थळावर रजनीचा जन्म, जीवन, चित्रपट तसेच त्यांच्यावरील विनोद सर्व प्रकारची माहिती त्यावर उपलब्ध करून दिली आहे; परंतु तुम्ही मध्येच इंटरनेट ऑन केले तर रजनीच्या स्टाइलप्रमाणे कॉम्प्युटर स्क्रीनवर एक संदेश येतो.- अय्यो, दॅड वॉज अनएक्सपेक्टेड टू कीप ब्राऊजिंग स्वीच ऑफ युवर इंटरनेट.
साइट कशी करते काम ?
साइट फ्लॅशवर या वेबसाइटची यंत्रणा अवलंबून आहे. दोन टर्मिनल्समध्ये डाटा पॅकेट ट्रान्सफरवर नजर ठेवते. इंटरनेटचा स्पीड जेव्हा एकदम कमी असतो. त्याच वेळी साइट सुरू होते. हीच या साइटची थीम आहे.
वेबचटनीजचे क्रिएटिव्ह डायरेक्टर गुरबक्ष सिंह यांनी ही साइट तयार केली आहे. रजनीकांत यांच्या लार्जर दॅन लाइफ इमेजचा विचार करून ही वेगळी वेबसाइट सुरू करण्यात आली, असे सिंह यांनी सांगितले.
ही वेबसाइट जगातील पहिलीच ऑफलाइन वेबसाइट असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. रजनीच्या स्टायलिश इमेजप्रमाणेच या वेबसाइटची प्रतिमा चमत्कारिक आहे. धूमधडाक्याचे संगीत, चटकदार रंग, आयकॉनदेखील रजनीप्रमाणेच आहेत. या साइटची फेसबुक व ट्विटरवर चांगलीच धूम आहे. या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात हिट्स केले जात आहेत.