आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव सपाच्या तिकीटावर कानपूरमधून लोकसभा लढणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- लोकसभेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात, असे वक्तव्य करुन कामाला लागा असे संदेश देणारे समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.

यूपीमध्ये लोकसभेच्या सर्वांधिक अशा 80 जागा आहेत. यूपीमध्ये किमान 50 जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणा-या मुलायम यांनी आतापासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची तयारी सुरु केली आहे. अनेक जागांवर पक्षाचे संभाव्य उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. संभाव्य उमेदवार त्यासाठी पूर्वतयारीत गुंतले आहेत. मात्र, काही जागांवर मुलायम उमेदवार बदलत असल्याचे चित्र आहे.

हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव हे येत्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर कानपूरमधून लढणार आहे. तसेच गाजीपूर जागेसाठी याआधी घोषित केलेले उमेदवार व अखिलेश यादव यांच्या सरकारमधील मंत्री ओमप्रकाश सिंग यांचे नाव आता वगळण्यात आले आहे. त्या जागेवर आता सध्या खासदार असलेले राधेमोहन सिंग पुन्हा निवडणूक रिंगणात असतील.