आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ramdev Baba And Team Anna Together On Fast At Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदेव बाबांची पंतप्रधानांना हाकः ‘जागो मोहन प्यारे...’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात योगगुरू रामदेवबाबा आणि अण्णा हजारे वर्षानंतर रविवारी एका व्यासपीठावर आले. एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून रामदेवबाबांनी 4 जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा ग्रामीण भागातून सुरू होत असल्याचे जाहीर केले. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आॅगस्टपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, व्यासपीठावर उपस्थित टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काही नेत्यांची नावे घेतल्याने रामदेवबाबा नाराज झाले. यातून दोघांतील मतभेद जाहीरणे समोर आले.
उपोषणकाळात पोलिस बंदोबस्तही तगडा होता. किरण बेदी आणि मनीष सिसोदिया उपोषणात सहभागी झाले. यादरम्यान अण्णांच्या विरोधात एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अण्णांशी संबंधित काही लोक आपल्यावर अत्याचार करत असल्याची त्याची तक्रार होती.
दिल्लीसह पाटणा, रायपूर, भोपाळ, अहमदाबाद, हरिद्वार, लखनऊ इत्यादी शहरांमधून रामदेव समर्थक मोठ्या संख्येने आले होते.

रामदेवबाबा म्हणाले...
- पंतप्रधान जर प्रामाणिक आहेत तर काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषित करणे आणि लोकपाल विधेयक पारित करण्यात अडचण काय?
- 20 लाख कोटींच्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीत 80 टक्के काळा पैसा आहे.
- गेल्या वर्षी 4 जूनला रामलीला मैदानावर आमच्या आंदोलनात रावणलीला झाली होती.
- आमच्या उपोषणामुळे एकाच राजकीय पक्षाच्या पोटात दुखते आहे.

अण्णा म्हणाले...
- उमेदवारांना नाकारण्याचा (राईट टू रिजेक्ट) अधिकार मतदारांना मिळायला हवा.
- महाराष्टÑातील 36 जिल्ह्यांच्या दौºयावर होतो. रामदेवबाबांना शब्द दिला होता म्हणून आज दिल्लीत आलो.
- माझ्या आंदोलनामुळेच महाराष्टÑात 6 मंत्री आणि 400 नोकरशहा बडतर्फ झाले. माहितीचा अधिकार नसता तर आदर्श घोटाळा उघडकीस आलाच नसता.

सरकार काय म्हणाले...
- अण्णा आणि रामदेवबाबा लोकशाही संस्थांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संसदीय कार्यमंत्री हरिश रावत यांनी म्हटले आहे.

रामदेवबाबांच्या सात मागण्या
- परदेशातील 400 लाख कोटी इतका काळा पैसा देशात आणावा. ती राष्टÑीय संपत्ती जाहीर करावी.
- भ्रष्टाचार संपवण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद कराव्यात.
- भ्रष्टाचारात कोणी दोषी आढळला तर त्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात असावी.
- भ्रष्टाचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी द्रुतगती न्यायालये स्थापन करावीत.
- एक वर्षांत अशा प्रकरणांची सुनावणी पूर्ण व्हावी.
- सरकारी काम ठरावीक वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नियम आणि प्रशासकीय व्यवस्था करावी.

पुढे काय?
- 4 जून ते 8 आॅगस्ट : ग्रामसभांपासून खासदारांपर्यंत सर्वांना बाबांचे कार्यकर्ते पाठिंब्याची पत्र मागतील.
- 9 आॅगस्टपासून : खासदार किंवा राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही तर दिल्लीत आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू होईल.
- 25 जुलैपासून : टीम अण्णाने जंतरमंतरवर उपोषणाची घोषणा केलीच आहे. कॅबिनेटमधील 14 मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली नाही आणि लोकपाल विधेयक पारित झाले नाही तर हे पाऊल उचलले जाईल.
- सोनिया गांधी, नितीन गडकरी, मुलायमसिंह यादव, लालुप्रसाद यादव यांची भेट घेऊन रामदेवबाबा पाठिंबा मागतील.
रामदेव बाबा व टीम अण्णांत मतभेद; अरविंद केजरीवाल स्टेज सोडून गेले
PHOTOS: रामदेव बाबा आणि अण्‍णा हजारेंचे उपोषण
कमी खा; पाणी जास्त प्या - काँग्रेसचा रामदेव बाबांना खोचक सल्ला
सत्‍यमेव जयते आमिरसाठी पैसा कमाविण्‍याचे माध्‍यमः बाबा रामदेव यांची टीका