आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यवस्था बदलासाठी ३०० खासदार निवडून द्या, रामदेवबाबांचे जनतेला आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची व्यवस्था बदलायची असेल तर, संसदेत ख-या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी असलेल्या ३०० खासदारांना निवडून द्या. असे आवाहन योगगुरु रामदेव बाबा यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत रामदेव बाबा त्यांच्या पक्षाचे उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. भारत स्वाभिमान पक्षाच्या बॅनरखाली ते या निवडणूकीत उतरणार आहे. सोनीपत येथील मुरलाना गावातील कार्यक्रमात रामदेवबाबांनी त्यांच्या पुढील रणनितीची माहिती दिली. ते म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी जनतेच्या मदतीने किमान ३०० खासदार निवडून येणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड निवडणुकीआधी योग्य वेळी केली जाईल. देशाला वाचवायचे असेल तर जनतेने जागरूक राहिले पाहिजे.