आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdev Baba Joins Team Anna To Campaign In Polls

अण्‍णा हजारे-रामदेव बाबा एकत्र, विधानसभा निवडणुकांमध्‍ये करणार प्रचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः लोकपाल विधेयकासाठी लढत असलेले ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे आणि योगगुरु रामदेव बाबा पुन्‍हा एकत्र आले आहेत. आगामी पाच राज्‍यांमधील निवडणूकांमध्‍ये ते एकत्र प्रचार करणार आहेत. स्‍वच्‍छ प्रतिमा असलेल्‍या उमेदवारांनाच मतदान करा, असे आवाहन ते मतदारांना करणार आहेत. कोणत्‍याही एका पक्षाच्‍या विरोधात ते प्रचार करणार नसल्‍याचेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. तर दुसरीकडे अण्‍णांचे समर्थक राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये गेल्‍याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
अण्‍णा हजारे यांनी मुंबईत उपोषण केले होते. त्‍यावेळेस त्‍यांनी रामदेव बाबांना व्‍यासपीठावर येण्‍याचे आमंत्रण दिले होते. त्‍यानंतर टीम अण्‍णाचे सदस्‍य मनिष सिसोदिया यांनी रामदेव बाबांना प्रस्‍ताव दिला होता. तो त्‍यांनी मान्‍य केल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. परंतु, रामदेव बाबा टीम अण्‍णासोबत कधी आणि कुठे प्रचार करणार, हे अद्याप स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले नाही. टीम अण्‍णाने प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍यात रामदेव बाबांना सोबत नेण्‍यात येईल, अशी शक्‍यता आहे.
टीम अण्‍णाने जाहीर केलेल्‍या कार्यक्रमानुसार 21 जानेवारीपासून उत्तराखंड येथील हरिद्वारपासून मोहिमद सुरु करण्‍यात येणार आहे. तर 2 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशात प्रचार करण्‍यात येईल. उत्तर प्रदेशात टीम अण्‍णाचे सहकारी वेगवेगळ्या भागात प्रचार करतील.
टीम अण्‍णाने प्रचार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर केल्‍यानंतर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पुन्‍हा एकदा अण्‍णा हजारेंवर तोफ डागली आहे. अण्‍णा हजारेंना त्‍यांच्‍याच गावातून पाठींबा मिळत नाही. त्‍यांच्‍या सहका-यांनी शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केला आहे, असे दिग्विजय सिंह म्‍हणाले. राळेगणसिद्धीच्‍या सरपंचांना राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्‍यावरुन सिंह यांनी ही टीका केली.
टीम अण्‍णा बॅकफूटवर, कोणत्‍याही एका पक्षाविरुद्ध प्रचार करणार नाही
रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं
रामदेव बाबांविरुद्ध चौकशीचा फास