आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळ्या पैशांबाबत रामदेवबाबांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांचा बाबांना पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- योगगुरू रामदेवबाबा यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन काळ्या पैशाविरुद्ध चालविलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. या दोघांत पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री आठ ते साडेनऊ अशी दीड तास चर्चा झाली. त्यानंतर पवार यांनी काळ्या पैशाचा प्रश्न व्यावहारिकदृष्ट्या व देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत पाठिंबा जाहीर केला.
रामदेवबाबा काळ्या पैशांबाबत वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी मंगळवारी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. काळा पैसा शोधून तो देशात कसा आणता येईल याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापुढे काळा पैसा तयार होणार नाही यासाठी विशेष कायदे करण्याची गरज आहे. तसेच सरकारने नविन स्वरूपाचे कर कायदे बनवावेत व नंतर ही रक्कम विकासकामांसाठी वापरण्यात यावी अशा स्वरुपाची चर्चा रामदेव व पवार यांच्यात झाली.
यावर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बेहिशोबी संपत्ती आणून देशाच्या विकासाच्या प्रवाहात सामील करणे योग्यच आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. रामदेव बाबा एका चांगल्या विषयावर चर्चा करीत आहेत. त्यांची भूमिका व्यापक असून रामदेवबाबा केंद्रातील तसेच बहुतांश राज्यातील जबाबदार नेत्यांना भेटले आहेत. ते कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून ते सर्वच पक्षांशी बोलत आहेत त्यांची ही भूमिका मला आवडली आहे, असे पवार यांनी सांगितले.
रामदेवबाबा यांनी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, माकपचे सरचिटणीस प्रकाश करात, अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जयललिता आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी त्यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. टीम अण्णाने (अरविंद केजरीवाल) ज्या १५ केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यात शरद पवार यांचाही समावेश आहे.
काळा पैसा किती? सरकारच अंधारात; आकडा गुलदस्त्यातच