आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींना मंचावर आणण्यासाठी रामदेवबाबांनी केला होता सौदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाच्या विरोधात आंदोलन करत असलेले रामदेवबाबा यांनी गेल्या आठवड्यात रामलीला मैदानात उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळावर गर्दी होत होती मात्र, सरकार त्यांना प्रतिसाद देताना दिसत नव्हते. सरकारकडून कोणीही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सन्मानपूर्वक उपोषण सोडण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली.
'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार रामदेवबाबांनी सर्वप्रथम ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना संपर्क केला. त्यानंतर टीडीपी नेते चंद्रबाबू नायडू यांना फोन केला. शनिवारी सायंकाळी रामदेवबाबांच्या मंचावर पोहचाणारे पहिले राजकीय नेते होते बीजेडीचे खासदार रवी महापात्रा. त्यानंतर टीडीपीचे दोन खासदार सी.एम.रमेश आणि के.नारायण यांनी मंचावर हजेरी लावली. रामदेवबाबांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही संपर्क केला मात्र, त्यांनी मंचावर उपस्थित राहाण्यास नकार दर्शविला.
रविवारी सायंकाळी जेव्हा स्पष्ट झाले की, युपीए सरकार रामदेवबाबांशी कोणतीही चर्चा करणार नाही तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना फोन केला. गडकरी यांची त्यांनी जूनमध्येही भेट घेतली होती. तेव्हा गडकरींनी त्यांना आश्वासान दिले होते की, तुमच्या रामलीला येथील आंदोलनाला उपस्थित राहिल मात्र, आंदोलनाची दिशा 'काँग्रेस विरोधी' असली पाहिजे.
पी. चिदंबरम क्रूर तर नवे गृहमंत्री 'सुशील'- रामदेव बाबांचे सर्टिफिकेट
रामदेव बाबांचा कॉंग्रेसविरुद्ध 'एल्‍गार', उपोषण सोडले; हरिद्वारकडे रवाना
आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष, आज देणार रामदेव बाबा क्रांतिचा नारा