आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Accused An Adult At Time Of Incident Rules Juvenile Board

सामुहिक बलात्‍काराच्‍या 8 वर्षांनी आरोपी अल्‍पवयीन नसल्‍याचा निर्वाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- सामुहिक बलात्‍काराच्‍या घटनेनंतर तब्‍बल 8 वर्षांनी एक आरोपी गुन्‍हा घडला त्‍यावेळी अल्‍पवयीन नसल्‍याचा निर्वाळा ज्‍युवेनाईल जस्टीस मंडळाने दिला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका सामुहीक बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पीडित मुलीवर 2 मे 2005 रोजी सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला होता. या अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करुन सहा जणांनी एका कारमध्‍ये तिच्‍यावर बलात्‍कार केला होता. यातील मुख्‍य आरोपी गौरव शुक्‍ला हा अल्‍पवयीन असल्‍याचा दावा करीत होता. दोन आरोपींना 2007 मध्‍ये शिक्षा झाली होती. दोन आरोपींचा कार अपघातात मृत्‍यू झाला. एका आरोपीची सुनावणी सुरु आहे. तर एक आरोपी अल्‍पवयीन असल्‍याचा दावा करीत होता. ज्युवेनाइल जस्टीस मंडळाने गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन नसून प्रौढ असल्याचा निर्वाळा दिल्याने त्याच्यावर सामान्य न्यायालयात खटला चालून मुलीला न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. गौरव शुक्‍ला हा समाजवादी पार्टीच्‍या एका नेत्‍याचा पुतण्‍या आहे. त्‍याच्‍या पहिल्‍या शाळेतील जन्‍मतारखेची नोंद मंडळाने ग्राह्य धरली. त्‍यानुसार तो अल्‍पवयीन नसल्‍याचे सिद्ध होते.

बलात्‍कार करताना आरोपींनी पीडित मुलीला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली होती. तसेच तिला जळत्‍या सिगारेटचे चटके देऊन आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्यानंतर खटला दाखल करण्यात आला होता.