आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Accused Harshly Beaten Up By People In Rajasthan

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणा-याला जनतेने दिला चोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर- देशात सामुहिक बलात्‍काराच्‍या अनेक घटना घडत आहेत. वाढत्‍या बलात्‍काराच्‍या घटनांनी जनतेमध्‍ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याची प्रचिती राजस्‍थानमध्‍ये एका घटनेत आली. अलवर येथे एक अल्‍पवयीन बलात्‍कार करणारा एक आरोपी संतप्‍त जनतेच्‍या हाती लागला आणि त्‍याची धो धो धुलाई झाली. लाथा बुक्‍क्‍यांनी मारुनही जनता थांबली नाही. तर त्‍याला वीजेच्‍या खांबाला बांधले आणि लाठ्यांनी त्‍याला बेदम चोप दिला. पोलिसांना हा प्रकार कळताच ते घटनास्‍थळी दाखल झाले आणि जगदीश नावाच्‍या या आरोपीला अटक केली.

प्राप्‍त माहितीनुसार, अलवर येथील एका अल्‍पवयीन मुलीवर दोघांनी बलात्‍कार केला होता. त्‍यापैकी जगदीश हा एक आहे. तो अलवर येथून पळ काढण्‍याच्‍या तयारीत होता. परंतु, रेल्‍वे स्‍टेशनला जात असतानाच पीडित मुलीचे पिता आणि मामांनी त्‍याला पाहिले. दोघांनी त्‍याला पकडले आणि रुग्‍णालयात पीडित मुलीसमोर त्‍याला नेले. तिने त्‍याला ओळखले. त्‍यानंतर त्‍याला ते बाहेर घेऊन आले आणि चोप द्यायला सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच आजुबाजूचे लोकांनीही त्‍याला मारहाण केली. लोकांचा रोष एवढा होता की त्‍याला जवळच्‍याच एका वीजेच्‍या खांबाला बांधले आणि लाठीने बदडले. रस्‍त्‍यावरुन प्रत्‍येक येणा-या-जाणा-याने त्‍याला चांगलाच चोप दिला. अखेर तो बेशुद्ध झाला.

पोलिसांनी त्‍याला अटक करुन न्‍यायालयात हजर केले. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली असून दारुच्‍या नशेत त्‍याने हे कृत्‍य केल्‍याचे म्‍हटले आहे.