आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा खटला दिल्लीतच चालणार : सर्वोच्च न्यायालय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - गेल्या महिन्यातील घृणास्पद सामूहिक बलात्काराचा खटला राजधानी दिल्ली बाहेर चालवण्याची आरोपीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश अल्तमश कबीर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही याचिका फेटाळली आहे.

गेल्या महिन्यात 16 तारखेला झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहापैकी एका आरोपीने खटला दिल्लीबाहेर चालवण्याची विनंती केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने दाखल केलेल्या अहवालानंतर सरन्यायाधीशांनी हे आदेश दिले. बलात्कारप्रकरणी मुकेशव्यतिरिक्त बसचालक रामसिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर या पाच जणांवर सत्र न्यायालयात खटला चालू आहे. या पाचही आरोपींवर खून, अपहरण, दरोडा, दरोडा घालताना जखमी करणे, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याचा व सामूहिक गुन्हा असे विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.