आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन पार्टनरवर बलात्काराचा गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आईवडिलांना नापसंत असल्याचे कारण पुढे करून पार्टनर सोबत विवाहास नकार देणा-या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन नावाचा हा तरुण पाच वर्षांपासून मैत्रिणीसोबत राहत होता.
न्यायदंडाधिकारी ज्योती क्लेर यांनी आरोपी रोहन याला 21 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. रोहनला अटक करताच त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. सन 2007 पासून रोहन आणि या तरुणीची लिव्ह इन रिलेशनशिप होती.रोहन मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत असून त्याची मैत्रीण एका खासगी बॅँकेत नोकरी करते. तरुणी रोहनला भावी पती समजत होती. मात्र, आपल्या लिव्ह इन संबंधास घरच्यांचा विरोध आहे, असे रोहनने सांगितल्यानंतर त्या तरुणीला धक्का बसला. मुलीने रोहनच्या आई-वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला घरी येण्यास मज्जाव करण्यात आला. रोहन दुस-या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखेर त्या पार्टनर तरुणीने गेल्या वर्षी 28 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली.

बदलीनंतर पुन्हा एकत्र : रोहन आणि त्याची मैत्रीण मेरठमध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांनी एमबीएचा अभ्यासक्रम एकत्र पूर्ण केला. दोघे 2007 मध्ये दिल्लीत आले व गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ते एकत्र राहत होते. या दरम्यान रोहनची राजस्थानमध्ये बदली झाली होती व तेथून दिल्लीत परतल्यानंतर पुन्हा दोघे एकत्र राहत होते.