आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गातील पाच मुलांकडून नववीतील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक अत्याचार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने बलात्कारसारख्या घटना रोखण्यासाठी कडक कायदा बनविण्यासाठी पावले टाकली आहेत. तरीही देशातील अशा घटनांची संख्या घटण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीपासून ते गुवाहाटीपर्यंत रोजच बलात्कार व लौंगिक छळाच्या घटना पुढे येत आहेत.

आता अशीच घटना हरियाणा राज्यातील फतेहाबादमधील ढिंगसरा येथील एका सरकारी स्कूलमध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थ्यासोबत त्याच्या वर्गातीलच पाच मुलांनी अनैसर्गिक अत्याचार करीत त्याचे चित्रण करीत मोबाइलवर व्हिडिओ बनविला. या प्रकरणाचा खुलासा शेजारील युवकाने केला ज्याला ही सारी घटना संबंधित मुलाने सांगितली. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये मुलांनी या मुलावर अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलगा काही अंतरावर असलेल्या स्कूलमध्ये आपल्या सहका-य़ांसोबत जातो. त्यातीलच पाच मुलांनी त्याच्यावर अत्याचार केला आहे.