आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्‍काराची मालिका सुरूच; दिल्‍लीत विदेशी महिलेवर अत्‍याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राजधानी दिल्‍लीमध्‍ये एका विदेशी महिलेवरील बलात्‍काराचे नवे प्रकरण समोर आले आहे. गुडगावमधील एका कंपनीत काम करणा-या पीडित महिलेने मित्रावर बलात्‍काराचा आरोप केला आहे. हौजखास पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटकही केली आहे.


चीनची 23 वर्षीय पीडित महिला गुडगाव येथील एका कंपनीत काम करते. सोमवारी रात्री तिचा मित्र तारिक शेख याने तिला मालवीय नगर येथील एका पार्टीत नेले. नंतर तिला लिप्ट देण्‍याच्‍या बहाण्‍याने आपल्‍या मित्राच्‍या घरी नेले. तिथे तिला बळजबरीने दारू पाजण्‍यात आली आणि नंतर तिच्‍यावर बलात्‍कार केला, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलिसांनी तारिकच्‍या घरी छापा टाकल्‍यानंतर तो फरार होण्‍यास यशस्‍वी झाला होता. मात्र, नंतर पोलिसांनी मोबाईलच्‍या लोकेशनवरून त्‍याचा ठावठिकाणा शोधून त्‍याला ताब्‍यात घेतले. त्‍याला न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे. पोलिसांनी याची माहिती चिनी दुतावासालाही दिली आहे.