आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Victim Delivers Baby Seeks Dna Test For Justice

बलात्कार पीडित महिलेने दिला बालकाला जन्म, माजी मंत्री दहू प्रसाद मुलाचे पिता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद: उत्तर प्रदेशात मायावतीचे सरकार असतानाचे मंत्री दहू प्रसाद अडचणीत सापडले आहे. प्रसादसह त्यांचा पीए अंगद सिंगवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करणार्‍या महिलेने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. दहू प्रसाद हेच जन्मलेल्या मुलाचे वडील आहेत, असा दावा या महिलेने केला आहे. यामुळे मुलाची डीएनए चाचणी व्हावी, अशी मागणी या महिलेने केली आहे.
'बसपाचे नेते दहू प्रसाद आणि त्यांचा पीए सिंग याने तब्बल एक वर्ष माझ्यावर बलात्कार केला. मला न्याय मिळावा म्हणून मी या मुलाला जन्म दिल्याचे कमलाने सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही दहू प्रसाद यांच्यावर कमलाने बलात्काराचा आरोप केला होता. त्यांनी केलेल्या बलात्काराचे फळ म्हणून कमलाला दिवस राहिले होते. कमला ही चित्रकुट जिल्ह्यातल बरगड येथील रहिवासी आहे. गरीबीने त्रस्त असलेल्या कमलाचा दहू प्रसाद यांनी फायदा घेतला होता. तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता, असा प्रसाद यांच्यावर आरोप होत आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणीही प्रसाद यांची चौकशी सुरु आहे.
‘त्या’ मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न
अल्पवयीन ननवर पादरीचा दोन वर्षापासून बलात्कार
अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार