आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - थ्री-डी इमेजिंग तंत्राचा वापर करून एका सहा महिन्यांच्या चिमुरडीच्या कवटीत कपाळावर अकाली एकत्र आलेल्या दोन हाडांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या हाडांवर वेळीच उपचार करण्यात आले नसते तर त्या चिमुरडीला अंधत्व आले असते आणि तिचा चेहराही कुरूप झाला असता असे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. या मुलीचा मेंदू आणि कवटीची वाढ होणे अपेक्षित असताना तिच्या कवटीची वाढ मात्र थांबली होती. त्यामुळे प्रचंड ताण येऊन तिला अंधत्व आणि चेह-यात विकृती आली असती, असे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. अमिताभ चंदा यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे आंतर कपाळात निर्माण झालेल्या दाबापासून मुलीची सुटका झाली. कपाळाची विकृती नीट करण्यात आली आणि चेह-यावर मधोमध निर्माण होत असलेली विकृतीही थांबवण्यात आल्याचे डॉ. चंदा यांनी सांगितले.

अशी केली शस्त्रक्रिया
सीटी स्कॅनच्या आधारे या मुलीच्या कवटीचे हुबेहूब थ्रीडी मॉडेल तयार करण्यात आले. त्यामध्ये आधी शल्यपरिवर्तन करण्यात आले. सर्व तोडजोड निश्चित झाल्यानंतर आणि मिलिमीटरच्या मापकावर प्रस्तावित कपाळावर एकत्र आलेली हाडे विलग करणे शक्य असल्याची खात्री झाल्यानंतर अवघ्या पाच तासांमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
डॉ. श्रीजन मुखर्जी, मॅक्सिलोफेशियल सर्जन

मुलीसाठी घेतला पुढाकार
एखादी मुलगी नीटनेटकी दिसणे आई-वडिलांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे असते याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळेच आम्ही ही दुर्मिळ, परंतु किचकट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि मेंदूविषयक व शल्यविषयक समस्या दूर केली.
डॉ. अमिताभ चंदा, मेंदूविकारतज्ज्ञ