आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rave Party Drugs Racket Busted By Kolkata Police

कोलकात्‍यायत ड्रग्‍स रॅकेटचा भंडाफोड, मुंबईतील रेव्‍ह पॉर्ट्यांमध्‍ये व्‍हायचा पुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाताः पश्चिम बंगालमध्‍ये एका मोठ्या ड्रग्‍स रॅकेटचा भंडाफोड करण्‍यात आला आहे. कोलकाता पोलिसांनी अंमली पदार्थांचा धंदा चालविणा-या दोन जणांना अटक केली असून ते कोलकाता शहरातील मोठे व्‍यापारी आहेत. राजीव मोहता आणि प्रत्‍युष चौधरी अशी त्‍यांची नावे आहेत. या रॅकेटच्‍या माध्‍यमातून गोवा आणि मुंबईत रेव्‍ह पार्ट्यांचे आयोजन करण्‍यात येत होते. या व्‍यापा-यांकडे आढळलेल्‍या ग्राहकांच्‍या यादीत कोलकात्‍यातील अनेक बड्या हस्‍तीचीही नावे आहेत.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रॅकेटच्‍या माध्‍यमातून धनाढ्य तरुणांनाच लक्ष्‍य करण्‍यात येत होते. हाय प्रोफाईल ग्राहकांना कोकेन व इतर अंमली पदार्थ पुरविण्‍यात येत होते. अलीपूर, बैलीगंग, साल्‍ट लेक इत्‍यादी धनाढ्य वसाहतींमध्‍ये या रॅकेटच्‍या माध्‍यमातून रेव्‍ह पार्ट्या आयोजित करण्‍यात यायच्‍या. वैवक्त‍िक ओळख असलेल्यांनाच आमंत्रण दिले जायचे.
गेल्‍या महिन्‍यात पोलिसांनी सिक्‍कीम येथुन एका ड्रग पेडलरला अटक केली होती. त्‍यानंतर तपासाचे सर्व धागे उलगडत गेले. कोलकातामध्‍ये 20 सेंटर्समधून पुरवठा व्‍हायचा.
हैद्राबादमध्‍ये रेव्‍ह पार्टी उधळली, सुरु होता तरुणींचा विवस्‍त्र नाच
'ती' रेव्‍ह पार्टीच होती, अपूर्व अग्निहोत्रीचा नमुना 'पॉझिटीव्‍ह'?
रेव्‍ह पार्टीमागे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा संशय