आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञ पोपटाने लावला लळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर/ प्रतापगड - उदयपूर येथील शिक्षक दिलीप पंड्या आणि त्यांचे कुटुंब एका रात्री गाढ झोपेत असताना अचानक ‘पापा-पापा’ या किट्टूच्या हाकांनी त्यांना जाग आली. सर्वांनी उठून पाहताच त्यांची पाचावर धारण बसली, कारण बिछान्याच्या अगदी जवळच एक साप होता. किट्टूने वेळीच सावध केल्यामुळे कुटुंबावरचे मोठे संकट टळले होते. कुटुंबाचा हा तारणहार किट्टू प्रत्यक्षात एक पोपट आहे.

मे 2003 मध्ये पंड्या यांचा मुलगा जय एका उद्यानात फिरत असताना त्याला जखमी अवस्थेत हा पोपट दिसला. त्याने पोपटाला घरी आणून त्याच्यावर उपचार केले. पोपट बरा झाल्यावर त्याला जयने त्याच उद्यानात सोडून देण्याचा प्रयत्न केला; पण पोपट उडून गेला नाही. तो जयच्या सोबत घरी परतला आणि तेथेच राहू लागला. पंड्या कुटुंबीयांनी त्याचे किट्टू असे नामकरण केले आणि तो पंड्या कुटुंबाचा एक सदस्य बनला.पंड्या यांच्या मुलांप्रमाणे किट्टू पंड्या पती-पत्नींना ‘पापा-मम्मी’ अशी हाक मारतो. पंड्या कुटुंबीयांनी त्याला कधीच पिंज-यात डांबून ठेवलेले नाही.