आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार रेखा बनणार राहुल गांधींच्या शेजारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अभिनेत्री तथा राज्यसभा खासदार रेखा यांना राजधानी दिल्लीत अखेर सरकारी निवासस्थान प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे रेखांना काँग्रेसचे युवा नेते, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारीच बंगला देण्यात येणार आहे. रेखा यांना अतिविशिष्ट तुघलक मार्गावर टाइप 7 चा 5 नंबरचा बंगला देण्यात येणार आहे. राहुल यांचा बंगला याच परिसरात असून त्याचा पत्ता 12-तुघलक मार्ग असा आहे.

पाच नंबरचा बंगला याआधी प्रसिद्ध क्रिकेटपटू, खासदार सचिन तेंडुलकरला देण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात पाहणी व सुरक्षा तपासणीही करण्यात आली होती. बंगला वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच त्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या व चर्चा सुरू झाली. त्यानंतर सचिनने आपल्याला बंगला नको असल्याचे सांगत आपण हॉटेलमध्ये राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तो बंगला रेखा यांना देण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. खासदारकीची शपथ घेतल्यावर रेखा यांना बलवंतराय मेहता मार्गावर 15 नंबरचा बंगला देण्यात आला होता. परंतु हा बंगला भाजपच्या माजी खासदाराच्या ताब्यात असून तो सोडण्यास त्यांनी नकार दिल्याने रेखांसाठी नवा बंगला शोधावा लागला. योगायोग असा की त्यांना उशिराने का होईना, बंगला आणि तोही राहुल यांच्या शेजारी मिळाला आहे.