आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘असीम महाराष्ट्र’ , प्रजासत्ताकदिनी राजपथावर ‘कैलास लेणी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर टाकणारी मराठवाड्यातील जगप्रसिद्ध कैलास लेणी प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार असून यासाठी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांचे एक पथक अहोरात्र काम करीत आहे.
‘असीम महाराष्ट्र’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून यंदाचे वर्ष हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असणाºया या लेण्यांची प्रतिकृती या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर अवतीर्ण करण्यात येत आहेत. कैलास लेणीच्या देखाव्यासोबत 20 कलाकारांचा चमू तांडवनृत्य सादर करणार असून यासाठी ठाण्यातील कलाकार दिल्लीत दाखल झाले आहेत. कैलास लेणीच्या देखाव्यासमोरच हे कलाकार तांडवनृत्य सादर करणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर एक, दोन नव्हे, तर अनेक हत्तीचे पथक संचलनामध्ये दिसणार आहे. हत्ती उत्तर प्रदेशातून नव्हे, तर ते भाजप-अकाली दलाची सत्ता असलेल्या पंजाब आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातून येणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये हत्तीचे पथक सहभागी होणार आहे, याची कुणकुण बसपाच्या नेत्यांना लागल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या विविध शहरांतील चौका-चौकांमध्ये टीव्ही स्क्रीन बसवले आहेत. निवडणूक आयोगाने लखनऊच्या पार्कमधील हत्तीचे पुतळे झाकल्यानंतर बसपाच्या नेत्यांनी ‘कॉँग्रेसच्या हत्ती’वर बसून मते मागण्याची रणनीती ठरवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या पथकामध्ये दोन डझनहून अधिक हत्तींची झुंड सामिल करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पथकामध्ये चोहिकडे हत्तीच हत्ती दिसून येतील. या पथकातील हत्ती सोंड उंचावून अभिवादन करतील. राजस्थानच्या कॉँग्रेस सरकारने आमेर किल्ल्याची थिम तयार केली आहे.

पंजाबचे महाकाय पथक
पंजाब सरकारने भाई रंजीत सिंह आणि त्यांच्या सेनेच्या थिमला आकार देण्यात आला आहे. भाई रंजीत सिंह यांच्या पुतळ्याच्या मागे दोन घोडे आणि त्याबरोबर दहा दहा फुटाचे दोन हत्तींचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने लखनऊच्या आंबेडकर पार्कमधील हत्तींना झाकण्याचा आदेश दिला. सोंड उंचावलेला हत्ती बसपाचे निवडणूक चिन्ह नव्हे तर सोंड खाली असलेला हत्ती हे निवडणूक चिन्ह असल्याचे बसपाने म्हटले होते. विशेष म्हणजे पंजाबच्या पथकामध्ये महाकाय हत्तीचे पथक तयार करण्यात येत आहे.