आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फतव्याचा आदर राखुन बँड बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू / श्रीनगर - काश्मिरातील मुलींच्या प्रगाश बँडच्या सदस्यांना ऑनलाइन धमकी देण्याच्या प्रकरणात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बँडमध्ये काम करणा-या एका तरुणीने होणा-या त्रासाला कंटाळून आर्जवी स्वरात म्हटले, आम्ही फतव्याचा आदर करतो, म्हणूनच बँड बंद केला आहे. कृपा करून आता तरी आम्हाला एकटे सोडा. दरम्यान, बँडमधील तीनपैकी एक तरुणी काश्मीर खोरे सोडून बंगळुरूला गेली आहे.

बँडची सदस्य पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. काश्मिरातील लाखो लोकांना दु:ख होईल, अशी कोणतीच गोष्ट आम्हाला करायची नाही. ज्या गोष्टीमुळे लाखो लोकांना दु:ख होत आहे. ती गोष्टी पुढे का न्यावी ? अशी भावना तिने व्यक्त केली. कोणाची भीती वाटते का, असे विचारल्यावर तिने नाही, असे उत्तर दिले. मात्र आम्हाला एकटे सोडा, असे आर्जव त्यांनी मीडियासमोर मांडले.

मुफ्ती खुश
मुलींनी बँड सोडला. ही बाब आनंद देणारी आहे, अशी प्रतिक्रिया बशीरूद्दीन अहमद यांनी दिली आहे. मात्र बँड सोडणे दुर्दैवी आहे. परंतु मुली गायन-वादन सोडणार नाहीत, अशी अपेक्षा सत्ताधारी नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
डिसेंबरपासून चर्चेत
दहावीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनी नोमा नजीर, फराह डीबा आणि अनिका खालिद यांचा हा बँड प्रगाश डिसेंबरमध्ये चर्चेत आला होता. बॅटल ऑफ बँड्स स्पर्धेत चांगल्या परफॉर्मन्सबद्दल पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर फेसबुकवर धमक्याचा मजकूर झळकू लागला. त्यामुळे या मुलींनी लाइव्ह शो बंद केला होता.

काश्मिरातील फुटीरतावादी गटांत फतव्यावरून मतभेद
बँडच्या प्रकरणात जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी गटांत मतभेद निर्माण झाले आहेत. दुख्तरनएमिल्लतने (डीइएम) मुलींना सामाजिक बहिष्काराचा इशारा दिला होता. मुस्लिम खवानीज मरकज (एमकेएम) या गटाने वेगळे मत मांडले. फतव्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. पुरुष गायकांच्या विरुद्ध फतवे का निघत नाहीत ? लष्कर आणि सरकारी समारंभात सहभागी होणा-या मुलींवर फतवे का निघत नाहीत ? असा सवाल एमकेएमचे जमरूदा हबीब यांनी उपस्थित केला. आम्ही डीइएमच्या मतांचा आदर करतो. परंतु सामाजिक बहिष्कार करू शकत नाहीत. त्याची गरजच नाही. आपण आपल्याच मुलींचा बहिष्कार कसा करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
12 जणांची चौकशी
प्रगाश सदस्यांना धमकवणा-या सहा लोकांची ओळख पटली आहे. आणखी 12 जणांची चौकशी करण्यात आली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या नातेवाईकांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले आहे. दोन नातेवाईक अजूनही काश्मीरमध्येच आहेत. बँड सोडण्याच्या निर्णयामुळे बँडमधील एक मुलगी नैराश्यात गेली आहे. त्यामुळे तिला बंगळुरूला पाठवण्यात आले आहे. धमकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा लोकांची ओळख पटली आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. लवकरच अटकसत्र सुरू होईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.