आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Retired Air Chief Marshal Tyagi Take Bribe Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्त हवाई दलप्रमुख त्यागी यांना लाच दिल्याचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अगस्ता वेस्टलॅँड हेलिकॉप्टर कंपनीकडून व्हीव्हीआयपींच्या वापरासाठी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी करारात निवृत्त हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांना लाच दिली होती. इटलीच्या न्यायालयात दाखल चौकशी अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मात्र रक्कम गुलदस्त्यात आहे. त्यागी यांनी दलालाची भेट झाल्याचे मान्य केले आहे, मात्र लाच स्वीकारल्याचा इन्कार केला.

दरम्यान सरकारने 12 पैकी 9 हेलिकॉप्टरच्या ऑर्डरला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी केली जावी की, थेट एफआयआर दाखल करावा यावर तपास अधिकारी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी एसआयटी(विशेष तपास पथक) किंवा सीव्हीसीकडून(केंद्रीय दक्षता आयोग) चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशी करणे आवश्यक आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
भारताने इटलीच्या फिनमेक्कानिका कंपनीची सहयोगी कंपनी अगस्ता वेस्टलॅँडकडून(यूके) 12 एडब्ल्यू 101 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. तीन हेलिकॉप्टर यावर्षी जानेवारी महिन्यात मिळाले आहेत. उर्वरित मार्च ते सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. फिनमेक्कानिकाचे प्रमुख जिउसेप्पे ओरसीला सोमवारी लाच दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. अगस्ता वेस्टलॅँडचे प्रमुख ब्रुनो स्पॅगनोलिनी यांना नजरकैद करण्यात आले आहे. 3600 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी 362 कोटी रुपये लाच दिल्याचा कंपनीवर आरोप आहे.

नातेवाइकांमार्फत लाच
* जुली त्यागी, डोस्का त्यागी व संदीप त्यागीमार्फत लाच पोहोचली. अगस्ता वेस्टलॅँडला लिलाव प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी अटीत बदल करण्यात आला.
* ऑपरेशन सिलिंगची अट 18000 फुटांपेक्षा कमी करून 15000 करण्यात आली.

स्पष्टीकरण
करार(मूल्यांकन, परीक्षण ) 2010 मध्ये झाला होता. त्याआधी 2007 मध्ये मी निवृत्त झालो. हेलिकॉप्टरसाठी कर्मचारी गुणवत्ता 2003 मध्ये निश्चित झाली होती. यामध्ये काहीही बदल झाला नाही. माझ्या कार्यकाळात केवळ निविदा जारी केली होती. हवाई दल त्यातील अटी बदलू शकत नाही.
रक्कम वसूल करू
घोटाळा झाला असेल तर रक्कम वसूल करू. दलाली दिल्याचे सिद्ध झाल्यास करार रद्द करू. घाईत कोणाला अटक करणार नाही.
ए.के. अ‍ॅँटनी, संरक्षण मंत्री

नावे जाहीर करा
घोटाळ्यात सहभागी लोकांची नावे सरकारने जाहीर करावीत. याप्रकरणी संरक्षणमंत्री, पंतप्रधान व सोनिया गांधी यांचेही उत्तरदायित्व ठरवले जावे.
रविशंकर प्रसाद, भाजप प्रवक्ते