आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revolt Against Nitish Four Top Leaders Left The Party

नितीशकुमारांचा हुकुमशाही कारभार; आरोपांच्या फैरी झाडत चौघांनी सोडला पक्ष!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीमुळे त्यांच्याच जेडीयू पक्षातील चार बड्या नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील सत्‍ताधारी जेडीयूचे प्रदेश प्रवक्ता आणि प्रदेश सरचिटणीस शंभूनाथ सिन्हा यांनी गुरुवारी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

सिन्‍हा यांचे म्हणणे आहे की, नितीश हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत. नितीशकुमारांनी माझ्यासारख्या नेत्याला माझे म्हणणे सांगण्यासाठी वेळ मागूनही गेली एक वर्षापासून मला वेळ दिली नाही. नितीशकुमारांच्या हुकुमशाही कारभाराचा यापेक्षा उत्तम उदाहरण सापडणार नाही. राजीनामा पत्र देताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नितीशकुमार जेव्हापासून दुस-यांदा सत्तेवर आले आहेत तेव्हापासून पक्षात लोकशाही राहिली नाही. कार्यकर्ते पूर्णपणे उपेक्षित राहिले आहेत. लालूप्रसादाची भीती दाखवून हे सरकार दहशत, अत्याचार आणि भ्रष्टाचाराला अधिकृत रुप देऊ पाहत आहे.
आणखी पुढे वाचण्यासाठी क्लिक करा....