आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉलिसिटर जनरल रोहिंटन नरीमन यांचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारताचे सॉलिसिटर जनरल रोहिंटन एफ नरीमन यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांनी अचानक दिलेल्‍या राजीनाम्‍याचे कारण समजू शकलेले नाही. गेल्‍यावर्षी गोपाल सुब्रह्मण्‍यम यांच्‍या जागी त्‍यांची नेमणूक करण्‍यात आली होती.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, कायदा मंत्री अश्विनी कुमार आणि नरीमन यांच्‍या काही विषयांवर मतभेद होते. गोपाल सुब्रह्मण्‍यम यांच्‍या राजीनाम्‍यानंतर नरीमन जुलै 2011 मध्‍ये सॉलिसिटर बनले होते. सुब्रह्मण्‍यम यांचा त्‍यावेळी दोन वर्षे कार्यकाल शिल्‍लक होता.