आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांची - माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्या, खासदार वृंदा करात यांनीही देशात भगवा दहशतवाद सुरू असल्याचा आरोप करतानाच त्याला प्रोत्साहन देण्याची राष्ट्री य स्वयंसेवक संघ, भाजपची भूमिका चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादाबद्दल जे मत व्यक्त केले त्याबाबत आपल्याला कोणतीही टिप्पणी करायची नाही, परंतु देशात हिंदू दहशतवादाच्या घटना घडल्या तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी त्यांना भेटण्यासाठी सर्वात आधी तेथे पोहोचतात. एवढेच नव्हे तर आरएसएसचे नेते त्या दहशतवाद्यांच्या बाजूने मतप्रदर्शन करतात. संघ, भाजपची ही भूमिका चिंताजनक वाटते. माकप अशा दहशतवादाच्या विरोधात आहे. करात यांनी सांगितले की, ‘दहशतवादी कुठल्याही धर्माचे असले तरी शेवटी ते दहशतवादीच आहेत. त्याचे समर्थन होता कामा नये. एखादा राष्ट्री य पक्ष, संघटना जेव्हा अशा गोष्टींचे समर्थन करते तेव्हा त्यातून अनेक बाबी समोर येतात. ती तथ्ये दडवण्यासाठी नेते आरोप - प्रत्यारोप करतात. देशाने आता हे वास्तव ओळखले आहे.
‘मधू कोडांसारखे प्रयोग नकोत’
झारखंडमधील भाजप, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चाच्या संधिसाधू राजकारणावर वृंदा करात यांनी कडाडून टीका केली. भाजप - झामुमोची आघाडी ही सत्तेसाठीच झाली होती. तिला कुठलेही नैतिक अधिष्ठान नव्हते. आता यूपीए आघाडी झारखंडमध्ये मधू कोडांसारखा एक्सपेरिमेंट पुन्हा एकदा करू पाहत आहे. त्यामुळेच विधानसभा भंग न करता तेथे संधिसाधू राजकारण व तडजोडीच्या खेळ्या खेळल्या जात आहेत. हा प्रकार बंद करून तेथे त्वरित निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही करात यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.