Home »National »Other State» Rolls Royce Ghost Car Show In Surat

‘कार’ पाहण्यासाठी आल्या एवढ्या कार

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 24, 2013, 04:46 AM IST

सुरत - कारची क्रेझ सुरत शहरात पाहण्यास मिळाली. सुमारे साडेतीन लाख लोकांनी ऑटो एक्स्पोला भेट दिली. अनेकांनी गाड्या बुक केल्या. पाच वर्षांतील सर्वात कमी कार विक्रीचा सियामचा दावा खोटा ठरवला. 4.5 कोटी रुपयांची रोल्स रॉइस घोस्ट येथे येणार्‍या प्रत्येकाचे आकर्षण होती. कंपनीने या गाडीच्या टेस्ट ड्राइव्हसाठी काही अटी ठेवल्या होत्या.
० सामाजिक जीवनस्तर पटवून दिल्यावरच टेस्ट ड्राइव्हची परवानगी.
० ग्राहकाचा पोशाख आणि वागणूक सभ्य असणे आवश्यक आहे.
० दरवाजा स्वत: उघडल्यास टेस्ट ड्राइव्ह रद्द, कारण हे चालकाचे काम आहे.
० विनाकारण कारचे इंजिन दाखवले जाणार नाही.

रोल्स रॉइसचा नकारही
रंजक

सुरतच्या सात इच्छुकांपैकी फक्त दोनच ग्राहकांना ही गाडी खरेदी करता येईल. इतरांंचे जीवनमान तपासले जात आहे. कंपनीने मल्लिका शेरावतला ही कार विकण्यास नकार दिला होता. कारण तिच्या पोशाखामुळे कंपनीची प्रतिमा डागाळेल.

भरतपूरच्या महाराजांनी कचरा उचलण्यासाठी वापरल्या
भरतपूरचे महाराज साध्या पोशाखात रोल्स रॉइसच्या शोरूममध्ये गेले असता त्यांना कार विकण्यास नकार दिला. महाराजांनी अन्य व्यक्तीच्या नावे 20 रोल्स रॉइस खरेदी केल्या. त्या राजवाड्यातील कचरा वाहून नेण्यासाठी वापरल्या. हे पाहण्यासाठी रोल्स रॉइसच्या अधिकार्‍यांनाही बोलावले होते.
(कविता राणी यांच्या ‘रॉयल राजस्थान’ या पुस्तकातून. अशीच दंतकथा बिकानेर, अलवर व म्हैसूरच्या महाराजांबाबतही सांगितली जाते.)

Next Article

Recommended