आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rs 20 Hike In Rajdhani, Shatabdi And Duronto Fares Likely

राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्‍स्‍प्रेसच्‍या भाडेवाढीची शक्‍यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जनतेने आणखी एका रेल्‍वे भाडेवाढीसाठी तयार रहावे. देशातील खास रेल्वे गाड्यांमध्ये समावेश असलेल्या राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्स्प्रेसच्या तिकिट दरांमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 15 ते 20 रुपयांची भाडेवाढ होऊ शकते, असे रेल्‍वेच्‍या सुत्रांनी सांगितले.

भारतीय रेल्वेने 10 वर्षांनी भाडेवाढ केली. ती 22 जानेवारीपासून लागू करण्यात आली. त्‍यातून राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्‍स्‍प्रेसला वगळण्‍यात आले होते. त्‍यामुळे या गाड्यांमध्‍ये आता दरवाढ करण्‍यात येणार आहे. या खास रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना पुरवण्यात येणा-या खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होत असल्याने दरवाढ करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा आणि किंमत यांचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीने केलेल्‍या शिफारशींनुसार ही दरवाढ करण्यात येत आहे. दरवाढ झाल्‍यानंतर निःशुल्‍क मिळणारी चॉकलेट्स आणि शीतपेये पुरविण्‍यात येणार नाहीत. तसेच आईसक्रीम आणि दही नामांकित कंपन्‍यांकडून पुरविण्‍यात येणार आहे.

खास रेल्‍वेमध्‍ये भाड्यामध्‍येच जेवण आणि स्‍नॅक्‍सचे दर समाविष्‍ट असतात. रेल्वे प्रशासनाने रेल्‍वेत मिळणा-या खाद्यपदार्थांच्‍या दर्जा सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले आहे. रेल्‍वेतील खाद्यपदार्थांचे दरही वाढणार आहेत. जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास ती नोंदवण्यासाठी 180011321 या दूरध्वनी क्रमांकावर मोफत हेल्पलाइन सेवाही सुरू केली आहे.