आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात आसाराम बापूंनी हाडपली 700 कोटींची 200 एकर जमीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेले संत आसाराम बापू संकटात सापडले आहेत. मध्यप्रदेशमध्ये अवैधरित्या 700 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेटिंग (एसएफआयओ) विभागाने बापूंच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एसएफआयओने मागणी केली आहे की, आयपीसी आणि कंपनी अॅक्ट 1965 नुसार बापू आणि त्यांचे चिरंजीव नारायण साईं यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. या विभागाने नुकतेच यासंबंधी कंपनी मंत्रालयाकडे याबाबत निवेदन दिले आहे.
मध्यप्रदेशमधील रतलाममधील 200 एकर जमीन बापूंनी व त्यांच्या मुलाने अवैधरित्या हडप केल्याचे 'एसएफआयओ'चे आहे. कंपनी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, आम्ही आसाराम बापू, त्यांचा चिरंजीव आणि इतर सहकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची व गुन्हा दाखल करण्याची 'एसएफआयओ'कडून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच कारवाई होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन दिल्ली-पुणे फ्रंट कॉरिडोर मार्गावर आहे. ही जमीन जयंत विटामिंस कंपनीशी संबंधित आहे. ज्यावर बापू यांनी 2000 पासून कब्जा केला आहे. तेव्हापासून आसाराम बापू या जमिनीचा वापर करीत आहेत. जेव्हीएल ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीला 2004 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)ने आपल्या यादीतून काढून टाकले होते. बीएसईच्या यादीत राहण्यासाठी कंपनीला शुल्क द्यावे लागते मात्र जेव्हीएलने शुल्क न दिल्याने त्यांचे नाव हटविण्यात आले होते.
जेव्हीएलची दुसरी फार्मा कंपनीला ग्लूकोज आणि विटामिनचे पूर्तता करणा-या अग्रणी कंपनीपैकी एक मानली जाते. जेव्हीएलने याबाबत तक्रार केली नाही मात्र, काही शेअरधारकांनी कंपनी मंत्रालयाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. ज्याची 2010 पासून एसएफआयओ करीत आहे. 'एसएफआयओ'ने दोन वर्ष चौकशी केल्यानंतर कंपनी मंत्रालयाकडे बापूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.