आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर राष्‍ट्रीय अस्मितेशी निगडीत मुद्या- मोहन भागवत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- राम मंदिराची निर्मिती ही राष्‍ट्रीय अस्मितेशी निगडीत मुद्या असल्‍याचे प्रतिपादन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केले. ते अलाहाबादमध्‍ये सुरू असलेल्‍या महाकुंभ मेळयातील धर्म संसदेपूर्वी बोलत होते.

भागवत धर्म संसदेपूर्वी साधू संतांसमोर बोलताना म्‍हणाले की, आता राम जन्‍मभूमीवर फक्‍त राम मंदिरची निर्मिती करण्‍याचा प्रश्‍न राहिलेला नाही. आता तो राष्‍ट्रीय अस्मितेशी निगडीत मुद्या झाला आहे.

धर्म संसदेत राम मंदिराशिवाय इतर अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्‍याचे भागवत यांनी यावेळी सांगितले. विश्‍व हिंदू परिषद (विहिंप) तर्फे गुरूवारी कुंभ मेळयातील सेक्‍टर 10 येथे दुपारनंतर धर्म संसद आयोजित करण्‍यात येणार आहे. या संसदेत आरएसएस, विश्‍वहिंदू परिषदेचे नेते तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि साधू सन्‍यासी भाग घेणार आहेत.