आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या निष्क्रीयतेची यादी लांब होत चालली आहे. असे असताना पंतप्रधान यश साजरे करत असल्यासारखे वागत आहेत. देशातील वीज पुरवठा खंडीत होणे आणि पी. चिदंबरम यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती यावर संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये संपादकीय लिहिले गेले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधताना त्यात म्हटले आहे की, 'देशाची व्यवस्था ढासळली आहे, भ्रष्टाचार आणि प्रशासनात गैरकारभार करणा-या नेत्यांना शिक्षा करण्याची कोणतीच व्यवस्था राहिलेली नाही. २जी घोटाळ्यात संशयांच्या फे-यात अडकलेले चिदंबरम यांना देशाचे अर्थमंत्री केले जाते, यामुळे पंतप्रधान देखील भ्रष्टाचारात सामील असल्याचे समोर आले आहे.'
संघाचे मत आहे की, भ्रष्टाचार केवळ व्यक्तीगत लाभासाठीच केला जातो असे नाही. कोणतेही कार्य जे देशाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि नैतिक स्वरुपाचे नुकसान करणारे असेल, तो सर्व भ्रष्टाचारच आहे.
अडवाणींची ब्लॉगवाणी : २०१४ मध्ये काँग्रेस - भाजपचा पंतप्रधान होणे अशक्य
पंतप्रधान-राष्ट्रपती पत्रव्यवहार खुला करण्यास मनाई
पंतप्रधान राजकीयदृष्ट्या \'नपुंसक\'; बाळासाहेबांच्या टीकेनंतर भडकले नेटिझन्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.