Home »National »Delhi» RSS Survey For BJP

संघाचा सर्व्हे : नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले नाही तर भाजपच्या 30 जागा घटणार!

सुजीत ठाकुर | Feb 20, 2013, 19:57 PM IST

  • संघाचा सर्व्हे : नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले नाही तर भाजपच्या 30 जागा घटणार!

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार येत्या लोकसभा निवडणुकीत जर भाजपने नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले तर, 180 जागा जिंकू शकते. भाजपने जर मोदींना पुढे केले नाही तर पक्षाला किमान 30 जागांवर नुकसान होऊ शकते. मात्र असे असले तरी संघ आणि भाजपा नेत्यात यावरही मंथन झाले आहे की, जरी मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 180 जागा जिंकल्या तरी सरकार स्थापनेसाठी व बहुमतासाठी 272 चा आकडा गाठणे अवघड आहे.

भाजपने मोदींच्या नेतृत्त्वाशिवाय जरी 150 जागा जिंकल्या तरी सहयोगी पक्षाच्या मदतीमुळे भाजप सरकार स्थापन करु शकते, यावरही चर्चा झडली आहे. आरएसएसच्या या अंतर्गत सर्व्हेवर मागील दिवसात भाजप आणि संघ नेत्यात दिल्लीतील मॅरेथॉन बैठका पार पडल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तासाच्या बैठकीत सुमारे 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ संघाच्या अंतर्गत सर्वेवर झाली. संघाने हा सर्व्हे देशभरातील दीड डजनापेक्षा जास्त खासगी एजन्सीकडून घेतले ज्यात संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

सर्व्हेत म्हटले आहे की, मोदींना प्रोजेक्ट केले तर याचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेश (24 जागा), गुजरात (23 जागा) आणि राजस्थान (22 जागा) येथे होईल. मात्र, उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी मोदींना प्रोजेक्ट केले तर भाजपच्या 10 (सध्या यूपीमध्ये भाजपचे 10 खासदार) जागावरुन 18 पर्यंत जाऊ शकतात.

बैठकीदरम्यान संघाने काढलेल्या निष्कर्षाबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने असहमती दर्शविली नाही. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वाखाली 180 जागा मिळाल्या तरी, बहुमताला आवश्यक अशा आणखी 100 खासदारांची जुळवाजुळव सहयोगी पक्षाकडून करताना भाजपला नाकीनऊ येऊ शकते. तसेच मोदींना प्रोजेक्ट न करता भाजपने 150 जागा जिंकल्या तरी बहुमतासाठी आणखी 120-25 खासदार संख्येसाठी सहयोगी पक्षाकडून मिळवणे सोपे जाईल. यात नितीश कुमार, ममता बनर्जी, जयललिता आणि नवीन पटनायक यांच्या पक्षांची मजबुरी आणि राजकीय गरज यावरही प्रकाश टाकण्यात आला.

Next Article

Recommended