आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rss Two Mouth Piece Differs Over Narerendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ऑर्गनायझर’मध्ये आता मोदींची तुलना वाजपेयींशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजीतील मुखपत्र ऑर्गनायझरने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी वेगळेच मत मांडले आहे. यात मोदींची तुलना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी करण्यात आली आहे. वास्तविक शनिवारी संघाचे हिंदी मुखपत्र पांचजन्यमध्ये मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती.
ऑर्गनायझरचा ताजा अंक रविवारी समोर आला. त्यातील एका लेखात म्हटले आहे की, वाजपेयी यांनी केले होते, तसेच काहीतरी मोदी करू शकतील. उत्तर प्रदेश, ओरिसा आणि हरयाणात भाजपच्या जागा वाढवण्याचे काम मोदी करू शकतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत मतांची टक्केवारीही वाढवण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. केंद्रात भाजपला सत्तेत आणण्याचे असेल तर करीश्मा असलेले नेतृत्व पुढे आणावे लागेल. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राजकीय विश्लेषक जीव्हीएल नरसिंह राव यांनी हा लेख लिहिला आहे.
पांचजन्यमधून मोदींना सल्ला देण्यात आला होता. शनिवारी या नियतकालिकात देवेंद्र स्वरूप यांचा लेख छापण्यात आला होता. त्यात मोदी यांनी आपली कार्यपद्धती आणि संघटनात्मक क्षमतांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
संघाने साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
भाजपमध्‍ये फुट? मुखपत्रातून गडकरी, मोदींवर टीका
नरेंद्र मोदी की आडवाणी?