आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान रश्‍दी यांचा 'लिटरेचर' महोत्‍सवातील कार्यक्रम रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरः वादग्रस्‍त लेखक सलमान रश्‍दी यांचा भारत दौरा रद्द करण्‍यात आला आहे. जयपूर येथे होणा-या 'लिटरेचर' महोत्‍सवात ते सहभागी होणार होते. त्‍यात 20 जानेवारी रोजी त्‍यांचे व्‍याख्‍यान ठेवण्‍यात आले होते.
सलमान रश्‍दी यांचा कार्यक्रम रद्द करण्‍यात आल्‍याची माहिती महोत्‍सवाचे आयोजक संजॉय राय यांनी दिली. परंतु, महोत्‍सवातील इतर कार्यक्रमांमध्‍ये कोणताही बदल करण्‍यात आलेला नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सलमान रश्‍दी यांच्‍या भारतातील कार्यक्रमाला तीव्र विरोध होत होता. अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. त्‍यामुळे सुरक्षेच्‍या कारणास्‍तवही जयपूर प्रशासनाने काही बैठका घेतल्‍या होत्‍या. रश्‍दी यांच्‍या दौ-यामुळे कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यादृष्‍टीने राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्‍याशीही दिल्‍लीत जाऊन चर्चा केली होती.