आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत रशियन महिलेवर सामुहिक बलात्कार; वैद्यकीय तपासणीसाठी पिडीत महिलेचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रशियाच्या एका महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सोबत पाच अज्ञात लोकांनी बलात्कार केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सिव्हिल लाइस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना त्यावेळी घडली ज्यावेळी ही महिला तिच्या पतिसोबत मजनू का टीला येथे गेली होती. सकाळी आठच्या सुमारास या महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने पिडीत महिलेच्या तक्रारीच्या हवाल्यावरून अशी माहिती दिली की, जेंव्हा ही विदेशी महिला तिच्या नव-यासोबत मजनू का टीला या परिसरात फिरत होती, तेंव्हा काही लोकांनी तिला जबरदस्तीने सुनसान ठिकाणी नेले व तिच्यावर बलात्कार केला.
पोलीस अधिका-याने सांगितल्यानुसार, महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी अरुणा आसफ अली रुग्णालयात नेण्यात आले. तेंव्हा त्या महिलेने वैद्यकीय तपासणीसाठी नकार दर्शविला.
त्यानंतर पोलिसांनी दिल्ली महिला आयोगाच्या अधिकारी शुभ्रा मेहदीरत्‍ता यांची मदत घेतली. परंतु विदेशी महिला वैद्यकीय तपासणीच्या विरोधात ठाम राहिली. विदेशी महिलेसोबत संवाद साधण्यासाठी दिल्ली विश्‍वविद्यालयातील रशियन भाषेचे जाणकार शिव कुमार यांचीही मदत घेण्यात आली. परंतु पिडीत महिलेने पोलिसांना लिहून दिले की, या घटनेला जास्त महत्व देण्यात ती इच्छुक नाही.
अल्पवयीन ननवर पादरीचा दोन वर्षापासून बलात्कार