आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणेच्‍या 'लता'ने नाकारला 'पद्मभूषण'; सुशीलकुमारही नाराज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली- यावर्षीचे पद्म पुरस्‍कार जाहीर होताच वादही सुरु झाले आहेत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध गायिका एस. जानकी यांनी पद्म भूषण स्विकारण्‍यास नकार दिला आहे. दक्षिण भारतामधील राज्यांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून एस. जानकी यांनी पुरस्कार नाकारला आहे.तसेच कुस्‍तीपटू सुशील कुमार यानेही पद्म पुरस्‍कारासाठी निवड न झाल्‍यावरुन नाराजी व्‍यक्त केली आहे.

जानकी यांनी सांगितले की, पुरस्कार देण्यात दक्षिण भारतीयांना डावलले जाते. त्यामुळेच हा पुरस्कार नाकारत आहे. पुरस्‍कार देताना उत्तर भारतीयांना प्राधान्‍य दिले जाते. पद्मभूषण मिळाल्याने फार आनंदही झाला नाही. मी 55 वर्षांपासून गाणी गात आहे. त्‍यामुळे पद्मभूषण नव्हे तर भारतरत्न मिळायला हवा, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.