आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saari In Shorts Scarts Pants Opra Leady Gaga Wear Saari

साडी घ्या आता शॉर्टस, स्कर्ट, पॅन्टच्या रूपात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकन टॉक शो स्टार ऑप्रा विन्फ्रे, पॉप स्टार लेडी गागा यांनी साडी परिधान करून भारतीय सांस्कृतिक परंपरेला साजेसा पेहराव केला. या दोन सेलिबे्रटींनी भारतीय वेषभूषेला आपलेसे केल्यामुळे, जगभर साडी नेसणे ही फॅशन होऊ पाहत आहे हेच दिसते. आता साडीला ग्लोबल करण्यासाठी ती शॉर्टस्, स्कर्टस्, पॅन्टस्च्या रूपात सादर केले जात आहे.
लंडन कॉलेज ऑफ फॅशनमध्ये शिक्षण घेतलेल्या दिल्ली येथील सान्या धीर यांनी शहरातील तरुण मुली आणि महिलांची गरज ओळखून साडीला नवा लूक दिला जात असल्याचे सांगितले.
आम्ही साडीला जागतिक ब्रँड बनवू इच्छितो. जगभरातील ग्राहकांना साडी सहजपणे मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे धीर यांनी सांगितले. धीर यांच्या ‘गो जवानी ’या साइटवरून
साडीची ऑनलाइन विक्री करण्यात येणार आहे. ही साइट आजपासून सुरू झाली.

अमेरिका, ब्रिटन, मध्य पूर्वेतील बाजारपेठेवर लक्ष
या निमित्ताने साडीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे धीर यांनी स्पष्ट केले. साडीच्या वाढत्या मागणीला आधुनिकतेची जोड का दिली जाऊ नये या विचारातून तिला आधुनिक रूप दिले जात असल्याचे सान्या धीर म्हणाल्या. डिझाइन म्हणून करिअरची सुरुवात करणाºया धीर यांनी मार्क जेकब आणि लाद्रो या ब्रँडसोबत काम केले आहे. अमेरिका, ब्रिटन, मध्यपूर्वेतील देशात अनिवासी भारतीयांची लक्षणीय संख्या पाहता त्या देशांमध्ये साडीला मोठी बाजारपेठ असल्याचे धीर यांनी सांगितले.

आंटी-बहेनजी, ओय तेरे बहेन की...
साडीला सान्या यांनी विविध प्रकारची मजेशीर नावे दिली आहेत. यामध्ये आंटी- बहेनजी, ओ तेरी बहेन की या नावांचा समावेश आहे. कॉर्पोरेट महिलांसाठी ट्राऊझरसह साडीचा पर्याय देण्यात आला आहे. अ‍ॅन्टी-बहेनजी साडी दररोजच्या वापरासाठी बनवण्यात आली आहे. सध्याच्या फॅशननुसार साड्यांची होणारी मागणी पाहता साडीला त्यानुरूप लूक देण्यात आला आहे..महिलांचा आधुनिक पेहराव आणि साडीच्या वाढत्या मागणीमुळे ती स्कर्ट, ट्राउझरच्या स्वरूपात आणली जात आहे. तसेच ‘ओ माय गॉड’ ही साडी शॉर्टस् आणि स्लीटच्या स्वरूपात बाजारात आणली आहे.