आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sabarimala temple in kerala in the millions on the horizon were the divine light

व्हिडीओ : रहस्यमय 'दिव्य ज्योत' पाहण्यासाठी लाखोंची गर्दी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबरीमला - मकर संक्रांतीच्या पर्वावर केरळमधील सबरीमला येथे लाखो लोकांनी रविवारी संध्याकाळी दिव्य ज्योतीचे दर्शन घेतले. गेल्या वर्षी सबरीमला येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १०० हून अधिक भाविक मृत्युमुखी पडले होते.
संध्याकाळी ६.३५ च्या सुमारास मंदिर परिसरातील टेकडीवर दिव्य ज्योत प्रकट झाली. यावेळी भाविकांनी स्वामी अयप्पांचा जयजयकार केला. यानंतर दोनदा ज्योत प्रकट झाली. लोकांनी प्रार्थना केली आणि ज्योत डोळ्यांत साठवून घेण्याचा प्रयत्न केला.
हा दैवी चमत्कार पाहण्यासाठी दरवर्षी खासकरून दक्षिण भारतातील सर्व भागातून लाखो लोक येतात. पर्वतराजीमध्ये वसलेले हे मंदिर एका पर्वतावर आहे. येथे आल्याने सा-या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
व्हिडीओतून पाहा चमत्कारी ज्योत...