आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबरमती तुरुंगात खोदले आरोपींनी 26 फूट भुयार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - येथील साबरमती तुरुंगात गुजरात बॉम्बस्फोटातील आरोपींनी पलायनाचा कट रचून 26 फूट लांबीचे भुयार खोदल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. ‘छोटा चक्कर’ बराकीत महिनाभरापासून हे भुयार खोदले जात होते.


तुरुंग अधीक्षक पी. सी. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, तुरुंगात फुलांचे ताटवे बनवण्याचे काम सुरू आहे. त्याच्या लाकडांचा उपयोग करून आरोपींनी खोली क्रमांक चारजवळ भुयार खोदण्याचे काम सुरू केले होते. भुयार खोदण्यासाठी ताट व लाकडी बेलण्याचा वापर केला जात होता. हा प्रकार रविवारीच तुरुंग प्रशासनाच्या लक्षात आला. मात्र, त्याची माहिती चोवीस तासांनी गुन्हे शाखेला देण्यात आली.

मुख्य दरवाजापासून 150 ते 200 फूट अंतरावर भुयार खोदण्याचे काम केले जात होते. या तुरुंगात अक्षरधाम व अहमदाबाद बॉम्बस्फोटातील एकूण 55 आरोपी आहेत. त्यापैकी 14 आरोपी ज्या बराकीत ठेवले होते, त्या भागात हे भुयार आढळून आले. दरम्यान, याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गृहराज्यमंत्री रजनीकांत पटेल यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. याबाबत तुरुंग प्रशासनाकडे त्यांनी अहवाल मागितला आहे.