आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी सचिनचे बालाजीला साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती - क्रिकेटचा देव म्हणून ओळख प्राप्त केलेल्या राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने शनिवारी तिरुपती मंदिरात जाऊन भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या महिन्यात सुरू होत असलेल्या टीम इंडियाच्या मालिकेत भारत विजयी व्हावा यासाठी सचिनने तिरुपतीला साकडे घातले. सचिन जवळपास 20 मिनिटे तिरुपती मंदिरात होता. त्याने पारंपरिक धोतर-सदरा घालून पूजा केली तसेच ‘सुप्रभात मंत्रोच्चरण सेवेत’भाग घेतला. पूजाविधीनंतर मंदिर प्रशासनाने सचिनला प्रसाद लाडू, पवित्र जल व रेशमी वस्त्र भेट म्हणून दिले. या वेळी मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष बापूराजू उपस्थित होते.