आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhvi Pragya Singh Is Suffering From Breast Cancer

साध्वी प्रज्ञाला कॅन्सर, प्रकृतीच्‍या तक्रारींकडे प्रशासनाने केले दुर्लक्ष- वकीलांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ । मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह हिला कर्करोग झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे प्रज्ञाला भोपाळमधील विवेकानंद स्‍पायनल सेंटरमध्‍ये दाखल करण्यात आले आहे. तपासणीदरम्‍यान कर्करोगाचे निदा करण्‍यात आले आहे. परंतु, मुंबईत प्रज्ञाच्‍या प्रकृतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप तिच्‍या वकीलांनी केला आहे.
जे. जे. रुग्‍णालय आणि न्‍यायालयामध्‍ये सुनावणीदरम्‍यान प्रज्ञाने वारंवार कमरेचे हाड आणि छातीमध्‍ये प्रचंड वेदना होत असल्‍याच्‍या तक्रारी केल्‍या होत्‍या. परंतु, त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याचा आरोप प्रज्ञाचे वकील पुरुषोत्तम पंजवानी यांनी केला आहे. मुंबईमध्‍ये दुर्लक्ष करण्‍यात आले. परंतु, भोपाळमध्‍ये बायोप्‍सी करण्‍यात आल्‍यानंतर कर्करोगाचे निदान झाले. प्रज्ञाला 13 मार्च रोजी भोपाळमध्‍ये दाखल करण्‍यात आले होते.
माझी मुलगी निर्दोषः साध्‍वी प्रज्ञा सिंगच्‍या आईचा टाहो
मालेगाव ब्लास्टमध्ये जबीउद्दीनचा हात; हिंदूत्त्वादी संघटनेचा आरोप