आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'काळवीट शिकार\'प्रकरणी सलमान खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजस्थानमधील जोधपूर येथे चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सलमानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर शिकार केल्याचा आरोप आहे.
राजस्थान सरकारने सलमान खानसह इतर कलाकारांवर काळवीटाची शिकार करून हिंसा पसरविल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात सलमानने हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टानेही सलमानच्या बाजूनेच निकाल दिला होता. मात्र राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, गुरुवारी राजस्थान सरकारची याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने सलमान खानवरील हिंसा पसरविल्याचे कलम (कलम १४६) लावता येणार नसल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडीमुळे सलमान खानसह इतर कलाकारांना दिलासा मिळाला आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथे ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे शुटिंग १९९८ सुरु असताना बॉलीवूडच्या कलाकारांनी काळविटाची शिकार केली होती. शस्त्रास्त्र कायद्यानुसार कलाकारांविरुद्ध दाखल करण्यात आले होते.
सत्र न्यायालयने या कलाकारांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार दाखल झालेले आरोप फेटाळल्यानंतर राज्य सरकारने २००६ मध्ये पुन्हा विनंती अर्ज सादर केला होता आणि त्यांच्यावर वन्यजीव कायद्यानुसार आरोप दाखल करण्यात आले होते. या निर्णयानंतर न्यायालयीन चौकशीत लघु न्यायालयात अभिनेता सलमान खानवर फक्त वन्यजीव कायद्याअंतर्गत कलम ५१ आणि आयपीसीचे कलम १४९ अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले होते. मात्र, राजस्थान सरकारने हिंसा पसरविण्याचे कलम लावले होते. त्यामुळे सलमानसह इतर कलाकार सुप्रीम कोर्टात गेले होते. अखेर आज सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे यांना दिलासा आहे.