आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan May Present In Front Of Jodhpur Court

सलमान, सैफ अली खान यांच्‍या खटल्‍याची सुनावणी करणारे जज सुटीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- काळवीट शिकारप्रकरणी चित्रपट अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्‍बू आणि सोनीली बेंद्रे यांना सोमवारी जोधपूर कोर्टात हजर व्‍हायचे होते. मात्र, या खटल्‍याची सुनावणी करणा-या मुख्‍य महानगर दंडाधिकारी चंद्रकला जैन या आजपासूनच सुटीवर गेल्‍या आहेत. त्‍यामुळे ही सुनावणी पुढच्‍या तारखेपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. पुढच्‍या तारखेस सर्वांवर नव्‍याने आरोप सुनावण्‍यात येणार आहे.

तत्‍पूर्वी, खासगी वाहिन्‍यांनी दिलेल्‍या वृत्तानुसार सलमान कोर्टात उपस्थित राहणार नसल्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. गेल्‍या सुनावणीवेळी मुख्‍यन्‍यायदंडाधिकारींनी सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्र, तब्‍बू तसेच दुष्‍यंत सिंग यांना कोर्टात हजर राहण्‍याचा आदेश दिला होता.